सोलापूर : स्वीट मार्ट दुकानात असलेल्या दुग्धजन्य पदार्थावर बनावटीची तारीख न लिहिल्याबद्दल विजापूर रोडवरील स्वामी समर्थ स्वीट मार्ट या दुकानदारास ७ हजार रूपयाचा दंड ठोठावल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी लोकमत शी बोलताना दिली.
अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार स्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणाºया खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ आॅक्टोबर २०२० पासून सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईसाठी मुदतबाह्य (बेस्ट बीफोर डेट) तारीख प्रदर्शित करणे आवश्यक होते, मात्र सोलापुरातील बºयाच स्वीट मार्ट दुकानात याबाबतची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या.
त्यानुसार शहरातील ४३ दुकानांची अचानकपणे पाहणी केली. त्यापैकी विजापूर रोडवरील स्वामी समर्थ स्वीट मार्ट व अन्य एका दुकानदाराने नियमांचे पालन न केल्याचे आढळून आले़ त्यापैकी एका दुकानादारावर दंडाची कारवाई करून एका दुकानदारास नोटीस बजावल्याचे राऊत यांनी सांगितले.