करमाळा नगर परिषदेचे नगरसेवक श्रीनिवास कांबळे यांचा मुलगा अर्जून (वय-२३) याची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली व १३ एप्रिलच्या रात्री तो मृत्युमुखी पडला. अर्जून पुणे येथे कॉम्युटर इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. साऱ्या भीमनगरमध्ये अर्जून हुशार मुलगा म्हणून परिचित होता. त्याच्या अचानक जाण्याने कांबळे कुटुंबीय हतबल झाले आहेत.
शहरातील गणेश नगरमधील संदीप जाधव या युवकाचे कोरोना संसर्गाने झालेला मृत्यू शहरवासीयांना चटका लावून गेला. संदीप हा बांधकाम मटेरियल वाहतुकीचा व्यवसाय करायचा. वडील हनुमंत जाधव एस. टी. मध्ये मॅकनिक विभागातून सेवानिवृत्त झाले होते. जेमतेम ३१ वर्षाचा संदीप वडीलांचा सेवानिवृत्तीनंतर आधार बनला होता. कुठे दोन पैसे मिळायला लागलेला असताना कोरोनामुळे संदीपच्या मृत्यूने जाधव कुटुंबीयांचा आधार गेला.
---
वाढदिवस साजरा करायचा राहूनच गेला
संदीप चा २६ एप्रिल रोजी वाढदिवस होता.. तो कष्टाळू व प्रामाणिक होता. शून्यातून त्याने हायवा टिपर हे वाहन कर्जाऊ घेऊन बांधकाम मटेरियल वाहतूकीचा धंदा तो स्वत: करायचा. पत्नी व दोन वर्षाची मुलगी असलेल्या संदीपचा येत्या २६ एप्रिल रोजी वाढदिवस होता. तो साजरा करायचा राहूनच गेला. दुदैवाने वाढदिवसाच्या पाच दिवस अगोदरच संदीप गेला असे जड अंत:करणाने त्याचा मित्र कैलास यादव यांनी सांगितले.
--
शहरवासीय हळहळले
सतत विनोद करून हसवणारे व सर्वांच्या परिचयाचे माजी उपनगराध्यक्ष राजकुमार परदेशी-हलवाई यांची कोरोनामुळे देवाज्ञा झाली तर गुजरगल्ली येथील बि-बियाणे विक्रेते बाबूशेठ कटारिया यांचासुध्दा कोरोनामुळे अचानक निधन झाल्याने शहरवासीय हळहळले.
-----
२०अर्जून कांबळे
२०संदीप जाधव
२०राजकुमार परदेशी-हलवाई