सोलापूर : स्वाईन फ्लू संसर्गाने कमलाबाई मारुती नळे (वय ६0, रा. वैष्णवीनगर, विजापूर रोड, सोलापूर) या वृद्धेचा शनिवारी मृत्यू झाला. अशाप्रकारे स्वाईन फ्लू संसर्गाने मरण पावलेल्यांची संख्या ६ झाली आहे.
कमलाबाई यांना १७ सप्टेंबरपासून त्रास होत होता. १८ सप्टेंबर रोजी उपचारासाठी त्यांना सिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.त्याच दिवशी त्यांच्या घशातील स्वॅप तपासणीसाठी घेण्यात आले. २0 सप्टेंबर रोजी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असताना २९ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. सर्व अहवालाची खातरजमा झाल्यानंतर याबाबत आरोग्य विभागाला कळविण्यात आले आहे. सोलापुरात १0 सप्टेंबरपासून स्वाईन फ्लू रुग्ण उपचारास दाखल झाल्याचे दिसून आले. त्यात १७ सप्टेंबर रोजी हमीदा शेख (दक्षिण सदर बझार) यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी शमीम बागवान (रा. एकतानगर), १६ सप्टेंबर रोजी लछण्णा चौधरी (रा. बाशीं), २७ सप्टेंबर रोजी गणेश एम. देशपांडे आणि २२ सप्टेंबर रोजी माधवी माने (रा. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) यांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत सोलापुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या ६ मृत्यूमध्ये चार रुग्ण शहरातील तर एक रुग्ण बार्शी आणि एक रुग्ण तुळजापूर येथील आहे.
स्वाईन फ्लूबाबत दक्षतास्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या साथीच्या आजाराबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी बैठका घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हाभर मोहीम सुरू आहे. १ आॅक्टोबरर्पंत शहर व जिल्ह्यात २0 हजार ५९७ रुग्णांचे स्वॅप घेण्यात आले. त्यात ८१ रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळले, त्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ६२0 डेंग्यू संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये २१२ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे,