कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागल्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र आता या उपक्रमाने शालेय विद्यार्थ्यांसोबत ज्येष्ठ नागरिक शेतकरी व्यावसायिक अशा सर्व स्तरातील नागरिकांना सामाजिक आणि शैक्षणिक ज्ञानाचे धडे मिळत आहेत.
या उपक्रमामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलला असून भिंतीवर शैक्षणिक अभ्यासक्रम सप्तरंग संगतीत चितारला आहे. त्यामुळे बालचमूंना खेळत बागडत शिक्षण घेता येत आहे. असा उपक्रम राबवणारे तडवळे जिल्ह्यातील पहिले व राज्यातील दुसरे गाव आहे.
या संकल्पनेत अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भित्तीचित्रकांद्वारे शिक्षण दिले जात आहे. गावातील भिंतींवर शैक्षणिक, सामाजिक, ऐतिहासिक, नैसर्गिक असे संदेश रेखाटून याद्वारे शिक्षण आणि जागृती साधण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या गावामध्ये तीन अंगणवाड्या, एक जिल्हा परिषद शाळा, एक वस्ती शाळा एक हायस्कूल या माध्यमातून शिक्षण दिले जाते. या शिक्षणाला अभ्यासाचं गाव या संकल्पनेने बळ दिले असून शिक्षकांनीही या उपक्रमात हिरीरीने भाग घ्यावा असे मत पुणे विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे व्यक्त केले.
यावेळी बार्शी व करमाळा नगरपालिकेचे प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे उपस्थित होते .
---
शिक्षक जेव्हा शाळेतील फळ्यावर शिक्षण देतो तेव्हा विद्यार्थी शिक्षित होतात त्याचवेळी गावातील मुक्या भिंती फळा होऊन शिक्षण देत असतील तर संपूर्ण गावच सुशिक्षित होईल
- विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे
---
फोटो : ०७ वैराग
बार्शी तालुक्यातील अभ्यासाचं गाव तडवळे गावात विभागीय शिक्षण उपसंचालक पाहणी करताना