सोलापूर : केंद्राच्या शासनाच्या पंतप्रधान मातृत्व योजना अंतर्गत प्रथम प्रसूती साठी आलेल्या महिलेचा डिलेवरी खर्च बाळाचे लसीकरण करून घेणे आणि गरोदर मातेस पाच हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. केंद्राची ही योजना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, म्हणून 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान मातृत्व योजनेचा सप्ताह साजरा केला जाता आहे.
याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी पालिकेच्या साबळे नागरी आरोग्य केंद्र येथे महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेविका वंदनाताई गायकवाड, नगरसेविका काकडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून गर्भिणी तसेच स्तनदा मातांना लस देऊन या योजनेचा लाभ देण्यात आला.
अधिकाधिक महिलांनी केंद्राच्या पंतप्रधान मातृत्व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले. तसेच आरोग्य अधिकारी डॅा. बसवराज लोहारे यांनी या योजनेची माहिती सांगितली.
यावेळी डॉ. अरुंधती हराळकर, डॉ. सायली शेंडगे, डॅा. इंगळे, डॉ. किरण गजगाने, डॉ. अश्विनी निम्बर्गी, डॅा नविद वड्डो, पी एच एन संगीता वैद्य, रजनी मोरे, स्मिता आंबेकर, उज्वला भोसले, अन्नपूर्णा कोळेकर, कांबळे मालन गायकवाड व साबळे नागरी आरोग्य केंद्राचा स्टाफ उपस्थित होता. सदर लसीकरण सत्रात ५० गरोदर व स्तनदा मातांचे लसीकरण करण्यात आले.