सरकारने तंबाखूचे पीक काढणे, त्यावर प्रक्रिया करणे, साठा करणे, खरेदी, विक्री करणे यावर बंधने घातली आहेत. सार्वजनिक ठिकाणी सेवन करणे, सिनेमा हॉल, मॉल, रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेज, सरकारी ऑफिस येथे विक्री व सेवन न करणे बंधनकारक आहे़. पण स्वयंशिस्तीचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, पण मानसिकता नाही़.
मुळात ही व्यसने परप्रांतात, परराज्यात, परदेशात मोठ्या प्रमाणात पसरली आहेत, पण यावर बंधने घालून किती यश मिळाले आहे? यासाठी डब्ल्यूएचओने ‘कमिट टू क्वीट’ कॅम्पेन घोषित केले आहे़.
तंबाखू सेवनाने आर्थिक, मानसिक, शारीरिक व वातावरण दूषित, आरोग्याची हेळसांड, पुढील पिढीवर परिणाम, त्यानंतरच्या उपचाराचा खर्चही फार आहे. एका धुरामध्ये ७०० ते ८०० विषारी घटक असून १० टक्के कॅन्सरजन्य आहे़.
आरोग्याची हमी यामध्ये तोंडाचा, घशाचा, फुप्फुसाचा, आतड्याचा, मूत्रसंस्थेचा, प्रेग्नेंसी, न्यू बॉर्न बेबीमध्येही परिणाम होऊ शकतो़. तसेच सीओपीडी, टीबी, अस्थमा इत्यादी श्वसनाचे रोग होतात़. शिवाय आर्थिक नुकसान व वातावरणही दूषित होते़. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, हार्ट प्रॉब्लेम, मेंदूवर परिणाम होतो.
लोक जागृतीसाठी तंबाखू सेवन किती हानिकारक आहे, याचा दुष्परिणाम कसा होतो, ते टाळणे शक्य आहे असे संशोधन करून त्यांची गाइडलाइन निश्चित केली आहे. ही व्यसनमुक्ती शक्य आहे, जर १. मानसिक तयारी, निश्चय, २. औषधोपचार, ३. सोशल सपोर्ट, ४. निकोटीन रिप्लेसमेंट, ५. गंभीरतेकडे पाहण्याची तयारी, ६. त्वरित डॉक्टरचा सल्ला़
तंबाखूमुक्तीसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी निरनिराळी व्यसनमुक्ती केंद्रे कमिट टू क्वीट, व्ही लव्ह क्वीटर, व्ही सपोर्ट, ऑनलाइन सपोर्ट असतो. पण ही सेवा तेव्हाच शक्य आहे, जेव्हा स्वत:ची मानसिक तयारी असते. यासाठी नॅशनल टोबॅको कंट्रोल प्रोग्राम उपलब्ध आहे. योग्य मार्गदर्शन घेणे शक्य आहे़
- डॉ. प्रकाश घटोळे
M.S.FMAS (Gen. Surgeon)
कन्सल्टिंग सर्जन