शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

चारचाकी गाडीच्या काचेला काळी फिल्म लावाल तर एवढा भरावा लागेल दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 2:40 PM

सोलापूर शहर वाहतुक शाखेचे आवाहन; काळी फिल्म लावलेल्या ५२२ वाहनांवर कारवाई

ठळक मुद्दे झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवरही काळी फिल्म लावण्याची मुभाकेंद्रीय मोटार वाहन नियमानुसार, सुरक्षेच्या कारणावरून महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी

सोलापूर : चारचाकी वाहनांवरील काळी फिल्म काढा, असा सल्ला देत शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाईच्या मोहिमेला सुरूवात केली आहे. मोहिमेदरम्यान ५२२ वाहनांवर कारवाई झाली असून, ६८ हजार ६00 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अतिमहत्त्वाच्या लोकांना काळ्या फिल्मची परवानगी आहे. 

काचांवर काळी फिल्म लावून राज्यात धावणाºया वाहनचालकांना तत्काळ रोखा. चालकांवर कारवाई करा आणि वाहनांवरील काळी फिल्म काढून टाका, असे आदेश वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांनी दिले आहेत. त्यामुळे फिल्म लावून धावणाºया वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार, सुरक्षेच्या कारणावरून महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावण्यास परवानगी आहे. झेड आणि झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचांवरही काळी फिल्म लावण्याची मुभा आहे. मात्र, अनेक जण आपल्या वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावून धावतात.

गैरप्रकारात गुंतलेली मंडळी या काळ्या फिल्मच्या आड काय करतात, ते वारंवार उजेडात आल्यामुळे अभिषेक गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र. २६५/ २०११) दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने वाहनांच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते. 

या आदेशाची काही दिवस पोलिसांनी अंमलबजावणी केली. आता मात्र जिकडे तिकडे काचांवर काळी फिल्म लावून धावणारी वाहने सर्वत्र आढळतात. अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

न्यायालयाचा अवमान समजला जाईल : पाटील- शहरातील वाहन चालकांनी या नियमाचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, आदेशाचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या आदेशाची अवमानना केल्याचे समजण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरcarकारRto officeआरटीओ ऑफीसCourtन्यायालय