शिबिराचे उद्घाटन तहसीलदार समीर माने, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत, राष्ट्रवादी पदवीधरचे अध्यक्ष रवींद्र वळेकर, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांच्या उपस्थित झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार संजयमामा शिंदे यांच्या सन्मानार्थ हे शिबिर पार पडले.
या शिबिरामध्ये तपासणीनंतर गरजू रुग्णांना चष्मे वाटप, डोळ्याचा ड्रॉप देण्यात आला. मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणाऱ्यांची नोंदणी करण्यात आली. नेत्रचिकित्सा शिबिराचा लाभ तालुक्यातील ५००हून अधिक नागरिकांनी घेतला. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ग्रामसेवक, पोलीसपाटील, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर यांना कोविड योद्ध्ंयाना गौरविण्यात आले.
यावेळी सुजित तात्या बागल, डॉ. विकास वीर, शीतल क्षीरसागर, उपाध्यक्ष रूपाली अंधारे, वंदना ढेरे, पल्लवी रनस्रुगारे, कार्याध्यक्ष स्नेहल अवचर ,सचिव मनीषा झिंजाडे, सरचिटणीस संस्कृती बागल यांनी परिश्रम घेतले.
----