आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेऊर येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, सभापती आनंद सोनकांबळे, दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, शीतल म्हेत्रे, प्रकाश हिप्परगी, महिबूब मुल्ला, नागनाथ सुरवसे, मल्लिकार्जुन पाटील, सिद्धार्थ गायकवाड, मंगल पाटील, सुनीता हडलगी, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगांव, विलास गव्हाणे, नितीन ननवरे, व्यंकट मोरे, महेबूब मुल्ला, बसवराज दोडमनी आदी उपस्थित होते.
प्रारंभी ग्रामदैवत काशीविश्वेश्वरांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. तसेच नदी चिंचोळी गावचे सरपंच करण शिंदे, वागदरीचे ग्रा.पं. सदस्य श्रीकांत इंडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी रामचंद्र अरवत, विश्वनाथ भरमशेट्टी, सिद्धाराम भंडारकवठे, पांडुरंग चव्हाण, हसद पिरजादे, सातलिंग शटगार, रवी शटगार, आलुरे, विलास सुरवसे, शिवाजी लालमदाने आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन तुकाराम दुपारगुडे यांनी केले.
.........
म्हेत्रे बंधूंची चौफेर फटकेबाजी
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुळे सभा, मेळावे झाले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ निर्माण झाली होती. मात्र बुधवारी जेऊर येथे काँग्रेसचा मेळावा पार पडला. यामध्ये माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी खास शैलीत केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांवर कडाडून टीका केली.
...............
फोटो ओळी
जेऊर (ता. अक्कलकोट) येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व समोर उपस्थित कार्यकर्ते.
......
(फोटो २५चपळगाव काँग्रेस मेळावा)