सोलापूर : शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेल्या आघाडी शासनाने राज्यात प्रचंड विकासकामे केली आहेत. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असो, की कोरोनाकाळात शासनाने जनतेसाठी केलेली सर्व प्रकारची मदत असो, ही कामे शिवसेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिकांनी घराघरापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केले.
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संकल्पना असलेल्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ सोमवारी मंगळवेढा येथे झाला.
यावेळी विधानसभा उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने, विधानसभा समन्वयक श्रीशैल्य कुंभार, विधानसभा संघटक बंडू शिंदे, तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, तालुका संघटक सतीश शिर्के, तालुका उपप्रमुख अरुण मोरे, कृष्णा सपकाळ, गंगाधर मसरे, संभाजी खापे उपस्थित होते.
सोमवारी मंगळवेढा तालुक्यातील माचणूर, बोराळे, मरवडे, हुलजंती, रेड्डे, नंदेश्वर, लक्ष्मी दहिवडी, मल्लेवाडी या पंचायत समिती गणांत तसेच मंगळवेढा शहरात बैठका घेण्यात आल्या.
---------
फोटो : १२ गणेश वानकर
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख गणेश वानकर.