आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : तक्रारदार यांचे वडील व नातेवाईकांनी जमीनचे वाटणी होण्यासाठी दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदवलेल्या दस्ताप्रमाणे फेरफारला नोंद धरून उताºयावर नावे लावून ७/१२ उतारा देण्यासाठी राजकुमार गुरूबाळ कोळी (वय ४० तलाठी सजा लऊळ, सजा पडसाळी ता़ माढा) यांना लाचेची मागणी केली़ ही मागणी केलेली लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़तक्रारदार यांचे वडील व चुलते यांनी भेंड येथील शेती गट नं ३३२ याची वाटणी होण्यासाठी दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात वाटणीपत्र करून ते नोंद केले होते़ सदर नोंद केलेल्या वाटणी पत्राप्रमाणे जमीनीचे ७/१२ उताºयावर नाव लावण्यासाठी फेरफार नोंद घेऊन तसा उतारा देण्यासाठी तलाठी कोळी यांच्याकडे अर्ज व दस्ताची प्रत दिली होती़ त्यावरून तलाठी कोळी यांनी नमुना ९ ची नोटीस दिली होती़ परंतू त्याप्रमाणे ७/१२ उताºयावर तक्रारदार यांचे वडील व चुलते यांची नावे लावून उतारा देण्यासाठी तलाठी कोळी हे तक्रारदार यांच्याकडे १ हजार रूपये लाचेची मागणी केली होती, त्यावरून तक्रारदार यांनी तलाठी कोळी हे लाचेची मागणी करीत असल्याबाबत सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मोबाईल अॅपवरून तक्रार नोंदविली होती़ यावरून सोलापूर विभागाने तक्रारदाराची खात्री केली असता तलाठी कोळी यांनी वाटणीपत्राप्रमाणे नावे लावून ७/१२ उतारा देण्यासाठी १००० रूपये लाचेची मागणी केली होेती़ सदर लाचेची रक्कम सोमवार २२ जानेवारी २०१८ रोजी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी लऊळ, ता़ माढा येथे स्वीकारताना रंगेहाथ पकडले़याप्रकरणी कुर्डूृवाडी पोलीस स्टेशनला राजकुमार गुरूबाळ कोळी (वय ४०) याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ ही कारवाई सहा़ पोलीस आयुक्त, पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे़
एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले, सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 5:10 PM