सोलापूर जिल्ह्यात २०१७ ते आजपर्यंत तलाठी व मंडळ अधिकारी यांची सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करण्यात आली नाही. जिल्ह्यात तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. तरी त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अतिरिक्त कार्यभाराचे वेतन देण्यात यावे, त्यांचे वेतन महिन्याच्या ५ तारखेपर्यंत व्हावे. निलंबित कर्मचाऱ्यांना १८ ते २० महिने पदस्थापना दिली जात नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत करावीत, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, गटविमा, इतर भत्ते वेळेवर मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोविड-१९ संदर्भात कामकाज करत असताना दोन मंडळ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांना शासकीय मदत मिळाली नाही. दुय्यम निबंधक कार्यालयाकडून येणारे दस्त सदोष असल्याने बरेच दस्त नष्ट करावे लागतात व पुन्हा पारंपरिक पध्दतीने नोंदी धराव्या लागतात. यासह विविध मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकारी कामबंद आंदोलन करीत बेमुदत संपावर गेले आहेत.
विविध मागण्यांसाठी तलाठी, मंडळ अधिकारी बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:20 AM