सध्या येथील तलाठी मंगळवेढा येथे राहतात. याबाबत त्यांना विचारले असता माझ्याकडे इतर गावचा कारभार असल्यामुळे मी येऊ शकत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यांचे सर्व शासकीय दप्तर त्यांच्याजवळच असल्यामुळे शासकीय कामासाठी त्यांना भेटण्यासाठी मंगळवेढा येथे संबंधितांना बोलावतात. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली. तसेच त्यांनी पूर परिस्थितीत पिकांचे पंचनामेसुद्धा परस्परच करून घेतले आहेत. वरिष्ठांनी याप्रकरणी लवकरात लवकर लक्ष घालून मल्लेवाडी ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कोट ::::::::::::::::::
मी रविवारी तलाठी कार्यालयात नवीन मतदारांची नोंद करण्यासाठी गेलो असता तलाठी कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले. संबंधित तलाठ्यांना फोन केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तहसीलदारांना फोन केल्यानंतर माझे काम मार्गी लागले.
- प्रा. राजाराम गोडसे, ग्रामस्थ, मल्लेवाडी