उडगी : अक्कलकोट तालुक्यात तळेवाड-बोरोटी स्टेशन हा चार किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादाक झाला आहे. २० वर्षांपूर्वी हा रस्ता झाला होता. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाला पाठपुरावा केला आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत. झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. नवीन रस्ता करावी, असे मागणी वाहनधारकांतून होत आहे.
अक्कलकोट तालुक्यातील ऊस उत्पादक बिलाच्या प्रतीक्षेत
उडगी : अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जयहिंद कारखान्याला २०१९-२० गाळप काळात ऊस दिला आहे. शेतकऱ्यांचे बिल थकीत असून, त्याची रक्कम अदा केलेली नाही. ही रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
साखरेवाडी-वाळूज पूल बनला धोकादायक
वाळूज : मोहोळ तालुका आणि उत्तर सोलापूर तालुका यांना जोडणारा वाळूज-साखरेवाडी रस्ता असून, या रस्त्यावर उभारलेल्या ओढ्यावरील पुलाचे संरक्षक पाइप आणि सिमेंटचे कठडे ऑक्टोबर महिन्यातील वाहून गेले आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. संबंधित विभागाने हा पूल वाहतुकीसाठी दुरुस्त करावा, अशी मागणी येथील प्रवासी व वाहनचालकातून होत आहे.
सोलापूर - वाळूज एसटी खड्ड्यामुळे बंद
वाळूज : लॉकडाऊननंतर सोलापूर-वाळूज ही बस पूर्ववत झाली होती. परंतु अतिवृष्टीमुळे वाळूज-साखरेवाडी ओढ्यावरील पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच गाळ साचल्यामुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे सोलापूर विभाग नियंत्रकांनी रस्त्याचे कारण सांगून एसटी सेवा बंद केली आहे. तसेच सोलापूरला जाण्यासाठी वेळ आणि पैशाची बचत व्हायची. पुलावरील व रस्त्यावरील खड्डे बुजून घ्यावेत, अशी मागणी प्रवासी व शेतकरी वर्गामधून होत आहे.