या कार्यालयात झाडाझुडपी वाढलेली आहेत. या परिसराची अवस्था खूपच बिकट झालेली आहे.
प्रभारींवरच कामकाज सुरू
या कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून उपविभागीय अधिकारी १, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक १, लिपिक १, शिपाई १ असे चार कर्मचारी कागदोपत्री असून, तेही प्रभारीच आहेत. उर्वरित जागा रिक्त आहेत. या कार्यालयात तलावासाठी प्रस्ताव तयार करणे, भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणे ही कामे केली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांची या कार्यालयात वर्दळ असते; पण सहा महिन्यांपासून ते बंदच आहे. शेतकरी रोज विविध कामानिमित हेलपाटे घालून जातात.
कोट ::::::::
अक्कलकोट येथील कार्यालयात एक अधिकारी, तीन कर्मचारी प्रभारी आहेत. त्यांना अन्य ठिकाणचाही चार्ज आहे. या कार्यालयातील बऱ्याच जागा रिक्त आहेत. या ठिकाणी लोकांची फारसी कामे नसतात. अनेकांना वैयक्तिक मोबाइल नंबर दिल्याने काम असेल तर संबंधित व्यक्ती फोन करते. त्यांना सोलापूर येथे बोलावून कामे करून देतो. मी ही प्रभारी असून, तीन ठिकाणचा चार्ज असल्याने सहा महिन्यात तीन वेळा अक्कलकोट येथे येऊन गेलो आहे.
- टी.बी. कांबळे,
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
फोटो
०४अक्कलकोट मालिका
ओळी : बंद स्थितीत असलेले अक्कलकोट येथील बोरी पाटबंधारे विभागाचे कार्यालय.