"दिल्लीत झाली बातचीत, राज्यातील नेते एकत्र बसू"; अजित पवारांचे लोकसभा निवडणुकीवर भाष्य

By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 3, 2024 03:07 PM2024-02-03T15:07:37+5:302024-02-03T15:08:07+5:30

माढा लोकसभा मतदार संघाबाबत उत्तर देणं टाळलं

"Talks held in Delhi, state leaders to sit together"; Ajit Pawar's Commentary on Lok Sabha Elections | "दिल्लीत झाली बातचीत, राज्यातील नेते एकत्र बसू"; अजित पवारांचे लोकसभा निवडणुकीवर भाष्य

"दिल्लीत झाली बातचीत, राज्यातील नेते एकत्र बसू"; अजित पवारांचे लोकसभा निवडणुकीवर भाष्य

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: लोकसभा निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार आहे, असे पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत दिल्लीत वरिष्ठांशी बातचीत झाली आहे. राज्यातील स्थितीबद्दल अद्याप चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. आम्ही एकत्र बसणार आहोत. बैठकीत जागा वाटपावर चर्चा करू, असे ते म्हणाले.

माढा लोकसभा मतदार संघात सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत. माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार देणार का याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर असून दुपारी शासकीय बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Web Title: "Talks held in Delhi, state leaders to sit together"; Ajit Pawar's Commentary on Lok Sabha Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.