सोलापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर तावशी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीने प्रथम, ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) द्वितीय तर सरफडोह (ता. करमाळा) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी पुरस्कार पटकावणाºया ग्रामपंचायतींची यादी जाहीर केली. २०१७-१८ मधील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय समितीने नुकतीच ग्रामपंचायतींची तपासणी केली. तावशी ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकासाठी पाच लाख रुपये , ब्रह्मपुरीला तीन लाख रुपये, सरफडोह ग्रामपंचायतीला दोन लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
अजनाळे, देगाव, कारकलला विशेष पुरस्कार- जिल्हास्तरीय विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींची यादी जाहीर करण्यात आली. यात पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व पाणी व्यवस्थापनचा स्व.वसंतराव नाईक पुरस्कार अजनाळे (ता. सांगोला) ग्रामपंचायतीला, कुटुंबकल्याण कार्यक्रमासाठी स्व.आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार देगाव (ता. मंगळवेढा) आणि सामाजिक एकता व लोकसहभागासाठीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कारकल (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.
तालुकास्तरावरील विजेत्या ग्रामपंचायती
- - या ग्रामस्वच्छता अभियानात तालुकास्तरावर तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यात एक लाख, ५० हजार आणि २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. बक्षीस पटकावणाºया ग्रामपंचायतींची क्रमवार नावे
- - अक्कलकोट : गौडगाव बु., चपळगाव- समर्थनगर.
- - बार्शी : शिराळे, जोतिबाचीवाडी, शेळगाव आर.
- - करमाळा : सोगाव प., सरफडोह, श्रीदेवीचामाळ.
- - माढा : वेणेगाव, आकुलगाव, शिराळ टें.
- - माळशिरस : रेडे, मोरोची, मोटेवाडी मा.
- - मंगळवेढा : ब्रह्मपुरी, देगाव, गणेशवाडी ,
- - मोहोळ : ढोकबाभुळगाव, पाटकुल, वडवळ.
- - पंढरपूर : वाखरी, तावशी, व्होळे. सांगोला : अजनाळे, यलमार मंगेवाडी, चिणके.
- - उत्तर सोलापूर : हिरज, पाकणी, सेवालालनगर.
- - दक्षिण सोलापूर : कारकल, वरळेगाव, फताटेवाडी.