सोलापूर : महापालिकेच्या कर संकलन विभागाने मिळकतकराच्या वसुलीसाठी गुरुवारपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत बड्या थकबाकीदारांच्या मिळकती तत्काळ सील करण्याचे आदेश उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील दिले.
कर संकलनासाठी ढेंगळे-पाटील यांनी सायंकाळी आढावा बैठक घेतली.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने कर संकलन अधिकाºयांचे वेतन रोखण्यात आले आहे. इतर विभागातील कर्मचाºयांनाही पुढील काळात दणका बसेल, असा इशारा ढेंगळे-पाटील यांनी दिला. कर संकलन विभागाच्या दिमतीला १६८ कर्मचारी देण्यात आले आहेत. हे कर्मचारी घरोघरी जाऊन नोटिसा बजावत आहेत. गुरुवारपासून थेट मिळकती सील कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिका कर्मचाºयांना रोखीने मिळकतकर स्वीकारु नये, असे आदेश दिले आहेत. कर्मचाºयांनी धनादेश स्वीकारावा किंवा डिजिटल पेमेंट करुन घ्यावे, असे सांगण्यात आले आहे. डिजिटल पेमेंट करुन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या पॉस मशीन अद्यापही कर्मचाºयांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वसुली कशी करायची, असा प्रश्न कायम आहे.
युजर चार्जेसच्या तक्रारीच्शहर विभागात यंदा १९३ कोटी रुपयांचे तर हद्दवाढ भागात १५२ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. शहरातील अनेक मिळकतींना चुकीची आकारणी झाल्याची तक्रार मिळकतदार करतात. हद्दवाढ भागात अनेक वर्षांपासून युजर चार्जेस आकारण्यात आले आहे. हे युजर चार्जेस रद्द करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे. पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दुसरीकडे प्रशासनाने नोटीस फी, वॉरंट फी आणि शास्तीची आकारणी सुरू केली आहे. त्याचा मोठा फटका शहरातील मिळकतदारांना बसत आहे.