रत्नागिरी: महाराष्ट्र लोकसेवा आयोमातर्फे २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा (पालतेकरवाडी) प्राथमिक शाळेतील उपशिक्षक सतिश प्रभाकर कोष्टी (मूळ गाव लक्ष्मी दहिवडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांची ३४० पैकी २१४ गुण मिळवून ४०४ रँकने निवड झाली आहे. कोष्टी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर हायस्कूल, लक्ष्मी दहिवडी येथे, उच्च माध्यमिक शिक्षण सांगोला येथे झाले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पदवी तर पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झाले. कोष्टी यांनी सांगली येथे डी. एड. तर दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून बी. एड. शिक्षण घेतले आहे. (प्रतिनिधी)
शिक्षक कोष्टी झाले फौजदार
By admin | Published: March 15, 2015 11:39 PM