कोरोना विषयक जनजागृतीसाठी शिंदे यांनी विशेष अशी जागृती पोस्टर तयार करून घेतली आहेत. घरोघरी जाऊन कोरोना आजार, प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, शासनाच्या सूचनांच्या अंमलबजावणीची आवश्यकता, कोरोना लसीकरणाची गरज याबाबत शिंदे या नागरिकांना तोंडी माहिती देत आहेत.
कोरोनाबाबत प्रबोधन करण्यासाठी शिंदे यांनी चिकट पोस्टर बनवून घेतले आहेत. शिंदे यांच्या या योगदानाचे सरपंच काशीनाथ भुजबळ, शिक्षण विस्ताराधिकारी अनिल बदे, केंद्रप्रमुख दत्तात्रय खाटमोडे यांनी कौतुक केले. यावेळी विषयतज्ज्ञ देवीदास जाधव, अंगणवाडी सेविका पद्मिनी मोटे, मदतनीस रोहिणी नाळे, आशा सेविका राणी नाळे आदी उपस्थित होते.
------------
असा आहे पोस्टरवरील संदेश
मास्कचा वापर करू, कोरोनाला दूर सारू, सॅनिटायझर वापरुया, कोरोनाला हरवूया, अंतर सुरक्षित हेच खरे जनहित, कोरोनाची लस घेऊया, कोरोनाला रोखूया, लसीकरणाची नाही भीती, कोरोना रोखणे आपल्या हाती, लसीकरण कराल तर कोरोना टाळाल. अशा प्रकारच्या कोरोना जागृती संदेशांचा समावेश त्या पोस्टरवर करण्यात आला आहे.
---
कोरोना लढ्यात काळजी आवश्यक
कोरोना विरोधातील लढ्यात प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाच्या सूचनांचे पालन, कोरोना उपाययोजनांची केलेली प्रामाणिक अंमलबजावणी, लसीकरण यामुळे कोरोनाला प्रतिबंध करता येणार आहे. त्यामुळे त्याविषयी जनजागृतीसाठी आपलेही योगदान म्हणून प्रयत्न करत आहे.
- अनुराधा शिंदे, प्राथमिक शिक्षिका
----
अतिशय स्तुत्य योगदान
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिक्षिका अनुराधा शिंदे यांनी नागरिकांची जनजागृती करण्यासाठी घेतलेला पुढाकार, तसेच त्यासाठी पोस्टरचा केलेला वापर निश्चितच कौतुकास्पद आहे.
- अनिल बदे, शिक्षणविस्ताराधिकारी
फोटो ओळी :
करमाळा तालुक्यातील नाळेवस्ती येथे प्राथमिक शिक्षिका अनुराधा शिंदे कोरोना विषयक जनजागृती घरोघरी जाऊन करत आहेत.