सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना केंद्रशाळेने ड्रेसकोड म्हणून ठरविलेल्या काळ्या रंगाच्या ब्लेझरला बार असोसिएशनने विरोध केला आहे. काळा कोट ही वकिलांची ओळख असून त्यामध्ये इतरांना समाविष्ट करता येणार नाही.दिवाळी सुटीनंतर १९ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून शिक्षकांना ब्लेझरसह वर्गावर हजर राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. जिल्ह्यात १0 हजार शिक्षक कार्यरत आहेत. सर्वांनी जर काळ्या रंगाचा ब्लेझर ड्रेसकोड म्हणून परिधान केला तर वकील आणि शिक्षकांमध्ये फरक जाणवणार नाही. सर्व जण काळा कोट वापरू लागले तर वकिलांची वेगळी ओळख राहणार नाही. त्यामुळे हा ड्रेसकोड वा त्याचा रंग बदलावा असा वकील मंडळींचा सूर आहे.
शिक्षकांच्या ड्रेसकोडला वकिलांचा विरोध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 4:56 AM