शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी दक्ष राहावे - डॉ. प्रकाश महानवर

By संताजी शिंदे | Published: May 28, 2024 6:34 PM

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंमलबजावणी संदर्भात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर बोलत होते.

सोलापूर : यंदाच्या २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. ३४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व संस्थांचालक, प्राचार्य व शिक्षकांनी दक्ष राहून योगदान द्यावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंमलबजावणी संदर्भात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर बोलत होते. यावेळी मंचावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंग बिसेन, कुलसचिव योगिनी घारे, वक्ते मुंबई विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मंदार भानुशे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी केले. मान्यवरांचा परिचय प्राचार्य डॉ. ई. जा. तांबोळी यांनी करून दिला.      कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना एका बहु विद्याशाखीय पद्धतीने अभ्यास करता येणार आहे. यामध्ये विविध विषय घेऊन विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करता येईल. त्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विविध प्रकारचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. संलग्नित महाविद्यालयांनी देखील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नियोजन करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.

टॅग्स :Solapurसोलापूर