ऑनलाईन अभ्यासाचे संकल्पक शिक्षकांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोळ : कोरोना काळात मुलांचे झालेले नुकसान भरून काढता येणार नसून ते भरून काढण्यासाठी अनिल कुलकर्णी यांच्या टीम अंकोलीने ऑनलाईन अभ्यास, ऑनलाईन लाईव्ह अध्यापनसारखे उपक्रम आणले. टीम अंकोली ऑनलाईन अभ्यासाचे संकल्पक शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासमालेचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औंढीच्या सरपंच जयश्री अंबुरे होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण राज्यभरातून अभ्यास करणाऱ्या टीम अंकोली ऑनलाईन अभ्यासाचे संकल्पक व निर्मिती करणारे महेश गोडगे, दीपक पारडे, नेताजी रणदिवे, शरद माने यांचा सत्कार करण्यात आला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात विविध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल हनुमंत बनसोडे व शरद माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासमालेचे वाटप करण्यात आले .
अनिल कुलकर्णी यांच्या माझ्या स्मार्ट अभ्यासमालेच्या प्रकाशन सोहळ्यास झेडपी सदस्य शिवाजीराव सोनवणे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, सरपंच जयश्री अंबुरे, माजी उपसरपंच शांतीलाल अंबुरे, केंद्रप्रमुख तिपण्णा कमळे, विविध सोसायटीचे चेअरमन एकनाथ माळी, मारुती भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वाती भुसे, तानाजी जाधव, अंकोलीचे केंद्रमुख्याध्यापक धनंजय सुरवसे, शेजबाभूळगावचे मुख्याध्यापक बा. को. शिंदे, केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, औंढी शाळेतील सर्व शिक्षकवृंद मुख्याध्यापक चंद्रकांत भोई, उदय पोतदार, हनुमंत बनसोडे, विजयकुमार डोके, अनिल कुलकर्णी, शरद माने, सुखदेव सुरवसे, पंडित ढेपे, कृष्णदेव जांभळे, शिवशंकर राठोड, सुरेखा डोके, सुरेखा तोरवी, आशा खांडेकर, शशिकला पाठक, माजी विद्यार्थी गणेश अंबुरे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
----
फोटो : २० अंकोली
टीम अंकोली ऑनलाईन अभ्यासाचे संकल्पक शिक्षकांचा सत्कार व
शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासमालेचे वाटप करताना शिक्षक.