सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील २० गावचे सरपंच, उपसरपंच मंगळवारी निवडण्यात आले. खेडचे सरपंचपद रिक्त राहिले तर तेलगावमध्ये कोरमअभावी निवड पुढे ढकलण्यात आली
उत्तर सोलापूर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. निवडीसाठी नूतन ग्रामपंचायत सदस्यांची सभा आयोजित केली होती. खेड ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षण आहे. मात्र या संवर्गातील सदस्य नसल्याने सरपंचपद रिक्त राहीले. उपसरपंचपदासाठी नागेश कोकरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तेलगावच्या सरपंच पदासाठी रेवणसिध्द पुजारी व उपसरपंच पदासाठी काजल बनसोडे यांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र सरपंच निवडीवेळी सात पैकी चार सदस्य गैरहजर तर तीन सदस्य उपस्थित राहिले. कोरम पूर्ण झाला नसल्याने निवडीची सभा रद्द झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भोसले यांनी जाहीर केले.
तालुक्यातील २० ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच निवडण्यात आले.
होनसळ- महादेवी सौदागर पवार( सरपंच), शञुघ्न वानकर( उपसरपंच), गुळवंची- विष्णू भोसले( सरपंच), सागर राठोड( उपसरपंच), भोगाव- लताबाई भोसले( सरपंच), गोरख भोसले ( उपसरपंच), सेवालालनगर- कमला लक्ष्मण राठोड( सरपंच), खेमसिंग राठोड( उपसरपंच), हगलूर- आरिफा रफीक पठाण( सरपंच), कांताबाई दशरथ चव्हाण ( उपसरपंच), तळेहिप्परगा- वैशाली धुमाळ ( सरपंच), रोहन भिंगारे ( उपसरपंच), भागाईवाडी-छाया जाधव (सरपंच), उज्वला घोडके( उपसरपंच), कोंडी-सुमन राठोड ( सरपंच), कृष्णात भोसले( उपसरपंच), कळमण- पांडुरंग लंबे ( सरपंच), सुनील पाटील ( उपसरपंच), बेलाटी-शिवनेरी पाटील ( सरपंच), प्रभू राठोड( उपसरपंच), नान्नज-राणी टोणपे(सरपंच), ज्योती दडे( उपसरपंच), पाथरी- लक्ष्मी मळगे( सरपंच), श्रीमंत बंडगर ( उपसरपंच), हिरज- इलाही पटेल( सरपंच), गीता लिंबोळे ( उपसरपंच), पडसाळी- धर्मा रोकडे ( सरपंच), सीमंताताई भोसले ( उपसरपंच), तिर्हे- नेताजी सुरवसे ( सरपंच), तुकाराम मल्लाव ( उपसरपंच), बीबीदारफळ- अर्चना ननवरे( सरपंच), नारायण सर्वगोड ( उपसरपंच), साखरेवाडी- हिराबाई सुतार( सरपंच), रेवणसिध्द साखरे( उपसरपंच), बाणेगाव- लिंबाजी जाधव( सरपंच), वर्षा कांबळे ( उपसरपंच), राळेरास- नागनाथ माने( सरपंच), केशरबाई कांबळे ( उपसरपंच), एकरुख- कलावती मोरे( सरपंच), अजय सिताफळे ( उपसरपंच)