टेंभुर्णी : म्युकरमायकोसिस या आजाराने टेंभुर्णीतील एका महिलेचा पुणे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. म्युकरमायकोसिस या आजाराने जिल्ह्यात पहिलाच बळी ठरला आहे.
हिराबाई अजिनाथ कदम (६७) असे त्या महिलेचे नाव असून २८ एप्रिल रोजी त्या कोरोना बाधित आल्या होत्या. त्यांच्यावर टेंभुर्णीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १२ मे रोजी अचानक त्यांचे डोळे सुजले. त्यांना म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसून येताच पुणे येथे हलविण्यात आले. तेथे १६ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
---
या म्युकरमायकोसिस आजार कोरोना झालेल्या व मधुमेही असणाऱ्या रुग्णास होण्याचा सर्वाधिक धोका आहे. डोळा सुजणे, दुखणे, बंद होणे, दात दुखणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. यासाठी लोकांनी कोरोना असल्यास त्याचे लवकर निदान करून घ्यावे.
- डॉ. आनंद खडके
नेत्रतज्ञ - टेंभुर्णी