शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

३० जूनपर्यंत देऊळ बंद; श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 12:55 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय; विठ्ठलाचे दर्शन पुन्हा लांबणीवर...!

ठळक मुद्देश्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर ३० जूनपर्यत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णयसोलापूर जिल्हयात व पंढरपूर शहरात देखिल कोरोना रूग्ण आढळून आलेले आहेतश्री विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक गर्दी करतात.

पंढरपूर : सध्या दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे कोरोना बाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. लोकांनी एकत्र येणे टाळणे गरजेचे असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुन्हा देऊळ बंद ठेवण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. यामुळे ३० जून पर्यंत श्री विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितली.

श्री विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक गर्दी करतात. यामुळे श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर १७ मार्च ते ३१ मे २०२० या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाने ३० जून २०२० पर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. सोलापूर जिल्हयात व पंढरपूर शहरात देखिल कोरोना रूग्ण आढळून आलेले आहेत. तसेच ३१ मे रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे ३० जून २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, या सर्व बाबी विचारात घेता, मंदिरे समितीने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर ३० जूनपर्यत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस