आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळशिरस दि ५ : माळशिरस येथे टेम्पोचा अपघातात १२ भाविक जखमी झाले आहेत़ शिखर शिंगणापूर यात्रेवरून परतत असताना भाविकांच्या टेम्पोला झालेल्या अपघातात १२ भाविक जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली़ सर्वच जखमी उस्मानाबाद जिल्"ातील खामसवाडी येथील आहेत़ माळशिरस पासून ३६ किमी अंतरावर हेमांडपंती शंभू महादेवाचे मंदिर शिखर शिंगणापूर आहे. सध्या या महादेवाची याञा सुरू आहे. या ठिकाणी मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाविक चैत्री याञेसाठी येतात. भाविक दरवषीॅ प्रमाणे पायी चालत शिंगणापूर याञेसाठी आले होते. देवदर्शन करून हे भाविक खामसवाडी जिल्हा उस्मानाबादकडे निघाले होते. राजूरी ता.फलटण येथील आॅक्सीमिंन्ट कंपनीच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन टॅम्पो वेळापूरकडे निघाला होता. टेम्पो नं.एमएच ४२ एम ९४८ नातेपुते येथून वेळापूरकडे निघाला होता.या टॅम्पोमध्ये वरील भाविक बसले होते. तो टॅम्पो माळशिरस येथील पालखी तळ येथे आला मागील डाव्या बाजूकडील अचानक टायर फुटल्यामुळे टॅम्पो पलटी झाला.यामध्ये दोन महिला व दोन लहान मुलं हे पाण्याच्या बाटल्याच्या बॉक्सखाली सापडले होते.त्यांना गुदमरू लागली तेवढ्यात शेजारील लोकांनी त्यांना बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला.या गंभीर जख्मी झालेल्यांना पोलिस उपनिरीक्षक अनिल देवडे ,हवालदार माने तांबोळी यानी माळशिरस येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. टॅम्पो पलटी होताच चालक पळून गेला आहे.माळशिरस ग्रामीण रूग्णालयातील डॉ.स्मिता शिंदे ,प्रल्हाद डोईफोडे ,संतोष नडे ,लोखंडे सिस्टर ,मदने सिस्टर यांनी तातडीने प्राथमिक उपचार सुरू केले.त्यानंतर दोन लहान मुलांचे सिटीस्कॅन करावे लागत असल्यामुळे सर्व रूग्णांना अकलूज येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.------------------हे भावीक जखमीउस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी गावातील ,किरण काळे , महादेव काळे , लहू काळे , रामदास पवार, उषा पवार, सुनिल पवार ,दत्ता पवार, चिमणराव पवार, चंद्रभागा काळे व राधा काळे वय ३ वर्ष ,रोहन वय २ वर्षे सह १२ भावीक जख्मी झाले आसुनयातील रोहन काळे वय दोन वर्षे यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अकलुज येथे पाठविण्यात आले.
माळशिरस येथे टेम्पोचा अपघात १२ भाविक जखमी
By admin | Published: April 05, 2017 5:55 PM