मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून सोलापूरकडे निघालेला टेम्पो (क्र. एमएच १३ सीयू ९३९४) शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान देवडी गावच्या हद्दीत आला असता. तेथील हॉटेल कन्हैया चहा कॅन्टीनजवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या टेम्पोला (क्र. एमएच १२ एनएक्स ३०७७) पाठीमागून जोरात येऊन धडक दिली. या वेळी रोडवर उभ्या टेम्पोचा चालक नितीन हनुमंत घारे (वय ३८, रा. मुळशी, जि. पुणे) टायरची हवा चेक करीत होता. टेम्पो त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.
या प्रकरणी कॅन्टीनचालक रामचंद्र जाधव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत.
----
हॉटेलमधील बापलेक वाचले
भरधाव वेगात असणारा टेेम्पो तसाच पुढे जाताना एका हॉटेलमध्ये घुसला. त्या वेळी चहा कॅन्टीनमधील अमोल रामचंद्र जाधव व त्यांचे वडील रामचंद्र जाधव दोघेही वेगाने येत असलेला टेम्पो पाहून पाठीमागच्या बाजूने पत्रे वर करून पळून गेले. यामुळे त्यांचे प्राण वाचले. अपघातानंतर टेम्पोचालक व क्लीनर अंधाराचा फायदा घेत पळून गेले. या अपघातामध्ये दोन्ही टेम्पोचे व हॉटेल कॅन्टीनचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
----