तहसीलदार अभिजीत पाटील, तलाठी गणेश भुजबळ, शिपाई आतक, चालक पंचाळ यांनी १ जून रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास माण नदी पात्रातून (क्र. एमएच ०९/ई ९६८९) एक टेम्पो अर्धा ब्रास वाळू चोरून वाहतूक करताना पकडला होता. तहसीलदार पाटील यांनी सांगोला आगारप्रमुखांना सदरचा टेम्पो आगारात जमा करण्याविषयी लेखी पत्र दिले होते. त्यानुसार तलाठी गणेश भुजबळ यांनी सदरचा टेम्पो आगारात आणून लावला. दरम्यान अज्ञात इसमाने ४ हजार रुपयाच्या अर्धा ब्रास वाळूसह २ लाख ५० हजारांचा टेम्पो २ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास पळवून नेला. ही घटना उघडकीस येताच आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी तहसीलदारांना तत्काळ लेखी पत्र देऊन कळवले होते. याबाबत तलाठी विकास माळी (रा. मस्के कॉलनी, सांगोला) यांनी अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
चोरून वाळू वाहतूक करताना टेम्पो पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:16 AM