पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, पोलीस नाईक अभिजीत मोहोळकर, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील हे तिघेजण १३ मे रोजी सायं. ५ च्या सुमारास कटफळ दूरक्षेत्रात हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, महूद-पंढरपूर रोडने एक विनानंबरचा टेम्पो वाळू भरून जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी पवार वस्ती, गार्डी फाट्याजवळ गायगव्हाण येथे टेम्पो चालकास हाताचा इशारा करून थांबण्यास सांगितले. टेम्पो थांबताच पाठीमागे जाऊन पाहिले असता टेम्पोत वाळूसह वैभव शरद शेटे, नानासाहेब हंबीरराव रणदिवे, निखिल यशवंत वाघमारे, दीपक बाळू चव्हाण, बापूराव ऊर्फ राजेश तानाजी जावीर, रोहित महादेव लोखंडे, अमोल साहेबराव मंडले, अथर्व ज्ञानेश्वर मोरे, आकाश धनाजी गायकवाड (रा. दिघंची, ता. आटपाडी) हे नऊजण मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना, रॉयल्टी पावती आहे का याबाबत विचारपूस केली असता त्यांनी ती नसल्याचे सांगितले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी वरील ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१० हजारांच्या वाळूसह १० लाखांचा टेम्पो जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:21 AM