ज्ञानेश्वर नवत्रे, नितीन नवत्रे, नंदकुमार नवत्रे, शालन नवत्रे, रेश्मा नवत्रे, अर्जुन नवत्रे, मोहन नवत्रे, शोभा नवत्रे, संगीता नवत्रे, शिवानी नवत्रे (रा. लक्ष्मीनगर) अशी जखमींची नावे आहेत.
लक्ष्मीनगर येथील नंदकुमार ज्ञानेश्वर नवत्रे व बबलू उमेश नवत्रे यांच्यात सामाईक बांधावरून सांगोला न्यायालयात केस चालू असल्याने नेहमीच कुरबुरी होत असत. १६ एप्रिल रोजी स. १०:३० च्या सुमारास नंदकुमार नवत्रे यांची पत्नी नवोदय शेतात गवत काढण्यासाठी गेल्या असता त्यांच्या शेतात मोहन नवत्रे, उमेश नवत्रे, अर्जुन नवत्रे यांनी दगड टाकले होते. त्या दोघांनी त्यांना जाब विचारला होता. त्यावेळी त्यांनी दोघींना शिवीगाळ केली. म्हणून नितीन ज्ञानेश्वर नवत्रे यांनी त्यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. याच कारणावरून नवत्रे कुटुंबियातील महिला-पुरुषांनी एकमेकांना लोखंडी सळई, काठी, कुऱ्हाडीने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमींवर सांगोल्यातील ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत नंदकुमार ज्ञानेश्वर नवत्रे व बबलू उमेश नवत्रे या दोघांनीही पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.