पंढरपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, तसेच सर्टिफिकेट दुकानात ठेवावा, असे आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही सूचना जारी केल्या आहेत. पंढरपूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या असून, चाचणी बंधनकारक केली असल्याचे मानोरकर यांनी सांगितले.
सर्व व्यापाऱ्यांनी शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषदेचा जुना सरकारी दवाखाना येथे सकाळी ११ ते सायंकाळी ४ यावेळेत आपली कोरोना तपासणी करून घ्यावी तसेच तपासणी केलेले सर्टिफिकेट दुकानात ठेवणे आवश्यक आहे. कोरोना तपासणी न करता दुकान उघडता येणार नाही. तसे निदर्शनाला आल्यास त्वरित ते दुकान, आस्थापना बंद करण्यात येईल, असे मुख्याधिकारी मानोरकर यांनी सांगितले.