पहिल्याच दिवशी सुमारे १९८ टेस्टमध्ये दोन कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये आरटीपीसीआर ६६, अँटिजन टेस्ट १३२ घेण्यात आल्या आहेत. २,२००-२,३०० लोकसंख्या असलेल्या या गावात बाधित १२ रुग्ण असून, त्यापैकी दहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
यासाठी सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अझहर शेख, बाळाजी घोरपडे पोलीस अनिकेत मोरे, चंद्रकांत गोरे, होमगार्ड खोत, शिंदे, मदने, आरोग्य कर्मचारी गवसाने, आशा वर्कर घाडगे, आफ्रिन मुलाणी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच जानकाबाई मस्के, सदस्य समाधान नागटिळक, महादेव शेळके, महादेव नागटिळक, रामेश्वर नागटिळक, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, तलाठी आखाडे, अशोक शिंगाडे, तुषार नागटिळक, प्रशांत नागटिळक आदी उपस्थित होते.
----
फोटो ०४ माढा
ओळी : माढा तालुक्यातील खौरव येथे कोरोनामुक्त गाव या संकल्पनेतून सर्व ग्रामस्थांच्या कोविड टेस्ट घेण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.