गिरझणी गावातील गावठाण, जाधव वस्ती, सोनवणे वस्ती, पालकर वस्ती, गिरमे वस्ती, पवार वस्ती, ननवरे वस्ती, साठे वस्ती व नवीन वसाहत ईलाक्षीनगर या ठिकाणी १ जून ते १२ जून दरम्यान ४४७ रॅपिड व २२० आरटीपीसीआर टेस्ट असे एकूण ६६७ नागरिकांची टेस्ट करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगरअंतर्गत गिरझणी उपकेंद्रात कोविड रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट शिबिर प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, सहायक शिवाजी पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, शंकराव मोहिते पाटील बँकेचे अध्यक्ष सतीश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ.आव्हाड, आरोग्य सहायक नाईकवाडी, रूपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच गंगूबाई साठे, उपसरपंच जया पालकर, ग्रा. पं. सदस्य मयूर माने, सचिन गायकवाड, किशोर गिरमे, राजेंद्र माने, रमेश साठे, शुभांगी जाधव, मीनाबाई चोरमले, राणी माने, राणी जगदाळे, पोलीसपाटील महेश गिरमे, ग्रामसेवक सुधाकर मुंगूुसकर, तलाठी निकम आदी उपस्थित होते.
---
फोटो १५ अकलूज
गिरझणी, ता.माळशिरस गावातील नागरिकांना टेस्ट करताना वैद्यकीय अधिकारी आदी.
----