अजितदादा गटाच्या शहर कार्यकारिणीत १४४ पदाधिकारी, आमदार यशवंत माने यांच्या हस्ते देणार नियुक्तीपत्र
By राकेश कदम | Published: March 21, 2024 04:12 PM2024-03-21T16:12:14+5:302024-03-21T16:12:38+5:30
राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी निश्चित करण्यासाठी नुकतीच अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली हाेती. त्यानुसार निवड झाल्याचे संताेष पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काॅंग्रेस अजितदादा गटाची शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष संताेष पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. या कार्यकारिणीत १४४ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून ही कार्यकारिणी तयार केल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी निश्चित करण्यासाठी नुकतीच अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली हाेती. त्यानुसार निवड झाल्याचे संताेष पवार म्हणाले. नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे : जनरल सेक्रेटरी : प्रमोद भोसले. उपाध्यक्ष : किशोर पाटील, अनिल उकरंडे, करेप्पा जंगम, भास्कर आडकी, व्यंकटेश पोगुल, राहुल क्षीरसागर, उमेश जाधव, संतोष लोंढे, शितल गायकवाड, किरण कुमार शिंदे, अविनाश भडकुंबे, नितीन बंदपट्टे, बसवराज बुक्कानुरे, समर्थ राठोड, समर्थ बिराजदार. खजिनदार : युवराज माने. प्रवक्ते : नागेश निंबाळकर सुहास सावंत. या पदाधिकाऱ्यांसह सचिव, सहसचिव, कार्यकारिणी सदस्य अशा अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ,आनंद चंदनशिवे, महिला शहराध्यक्ष संगीता जाेगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, राजेश देशमुख, श्रीनिवास कोंडी, बिज्जू प्रधाने गणेश पुजारी, प्रमोद भोसले, बसवराज कोळी, प्रिया पवार, कांचन पवार आदी उपस्थित हाेते.
ताेपर्यंत भाजप उमेदवाराचे काम करणार नाही -
संताेष पवार म्हणाले, राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीचे सरकार आहे. बारामती मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे नेते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विराेधात वक्तव्ये करीत आहेत. या नेत्यांना भाजपने आवर घालणे आवश्यक आहे. अन्यथा आम्ही साेलापूर मतदारसंघात भाजपचे काम करणार नाही.