सोलापूर : मणप्पूरम फायनान्सच्या येथील लक्ष्मी मार्केट शाखेत ब्रँड हेड (शाखाधिकारी) यांनी तिघांशी संधान साधून २ कोटी ३४ लाख ५२ हजार ३९६ रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दागिन्यांसह रोख रक्कम असा १ कोटी ५१ लाख ३५ हजार २ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी या प्रकरणाचा पर्दाफास करण्यात आला.
लक्ष्मी मार्केट शाखेच्या मणप्पूरम शाखेत ब्रँच डेड असलेल्या वृषाली विनित हुंडेकरी यांनी पदाचा गैरवापर करुन ३ कोटी २८ लाख १२ हजार ८९२ रुपयांचे सोने तारण ठेवून घेऊन त्यासाठी ८१ बनावट प्रकरणे केली. या प्रकरणासाठीची २ कोटी ३४ लाख ५२ हजार ३९६ रुपयांची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याची तक्रार मणप्पूरमचे एरिया हेड प्रवीण वरवटे यांनी शाखा प्रमुख वषाली हुंडेकरी यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात २८ सप्टेबर रोजी दिल्याने गुन्हा नोंदला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे सपोनि विजय पाटील, फौजदार अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने तपास सुरु केला. अगोदर शाखाप्रमुख हुंडेकरी यांना अटक केली. त्यांच्याशी चौकशी करत असताना हुंडेकरी यांनी खासगी इसम व लक्ष्मीकांत यतिराज बिहाणी, अश्विनी यतिराज बिहाणी आणि पंचप्पा अर्जुन काळे यांच्याकडून सोने तारण ठेऊन घेतले. त्या बदल्यात तिघांनी संगनमत करुन बनावट सोने तारण कर्जे तयार केली. त्या सोने कर्जाची एकूण रक्कम २ कोटी ३४ लाख ५२ हजार ३९६ रुपये रक्कम शाखाप्रमख हुंडेकरी यांच्यासह वरील तिघांनी वाटून घेतली. तसेच कटाचा भाग म्हणून फायनान्स कंपनीत ठेवून घेतलेले सोने वरील तिघांना परत करुन टाकल्याचे तपासात समोर आले.
एकाला सोलापुरातून, दोघे कर्नाटकातून उचललेखबऱ्याच्या माहितीनुसार तांत्रिक विश्लेषणाचा आधारे पंचप्मा अर्जुन काळे (वय- ५१, रा. शांतीनगर, मजरेवाडी) याला सोलापुरातून तर लक्ष्मीकांत बिहाणी व अश्विनी यतिराज बिहाणी (वय- ३७, उत्तर कसबा, सोलापूर) सध्या राधाकृष्ण कॉलनी सोलापूर) या दोघांना कर्नाटकातील यादगिरी येथून अटक करण्यात आली.दोन किलो सोन्यासह दीड कोटीचा मुद्देमाल जप्तअटक केलेल्या आरोपींचा सखोल तपास करुन आतापर्यंत त्यांच्याकडून २ किलो २०८ ग्रॅम सोने तसेच लक्ष्मीकात बिहाणी याच्याकडून ३५ लाख ११ हजार २१४ रोख रक्कम असा १ कोटी ५१ लाख ३५ लाख २ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.