सोलापूर : जीओ और जीने दो.. भगवान महावीर की जय.. असा जयघोष करीत मंगळवार पेठ पोलीस चौकीसमोर दिगंबर जैन समाज आणि श्वेतांबर जैन समाज या दोन शोभायात्रा एकत्रित आल्या. शोभायात्रेत सहभागी झालेल्यांनी दोन तास रथ ओढून जयघोष करीत सोलापूरकरांचे लक्ष वेधले.
निमित्त होते भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचे
मंगळवारी सकाळी दोन्ही शोभायात्रा मंगळवार पेठेतून एकत्रित निघाल्या. तत्पूर्वी दिगंबर जैन समाज शोभायात्रा माणिक चौकातून निघाली. मूळ रथातून भगवान महावीरांची प्रतिमा ठेवून शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेच्या पुढे चांदीची पालखी निघाली. या परिसरात आदीनाथ मंदिरावर यंदा प्रथमच सुंद्रीवादक भीमण्णा जाधव यांचे सुंद्री वादन झाले.
यावेळी वालचंद शिक्षण समुहाचे डॉ. रंजित गांधी, लक्ष्मी उद्योग समुहाचे संजीव पाटील, सुकूमार चंकेश्वरा, सुनील गांधी, महावीर शास्त्री, अनिल जमगे, हर्षवर्धन शहा, पराग गांधी, मंगेश शहा, संजय शहा, मनीष शहा, देवेंद्र षटकार, सुहास छंचुरे, आनंद तालीकोटी, सुनील गांधी, डॉ. महावीर शास्त्री, हर्षवर्धन शहा, पराग गांधी, मंगेश शहा, संजय शहा मनीष शहा देवेंद्र षटकार सुहास चिंचोरे आनंद तालीकोटी, केतन शहा, भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष शाम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सकाळी सात वाजता रंगभवन चौकात सकल जैन बांधव एकत्रित येत भगवान महावीरांचा जयघोष केला. ज्येष्ठ नागरिक, प्राणिमित्र विलासभाई शहा यांच्या हस्ते येथे ध्वजारोहण झाले. त्यानंतर येथून वाजत गाजत शोभायात्रा काँग्रेसभवनमार्गे निघाली.
दोन्ही शोभायात्रा आल्या एकत्रित
जोडभावी पेठेतून निघालेली जैन श्वेतांबर यांची शोभा यात्रा वाजत गाजत ही मंगळवार पेठ पोलीस चौकी समोर आली. दरम्यान माणिक चौकातून दिगंबर जैन समाज यांची शोभायात्रा आली. सकाळी दहा वाजता दोन्ही शोभायात्रा वाजत गाजत समोरा-समोर आल्या. एक मेकांना मान देत सारे जैन बांध एक झाले.