सोलापूर : मंगळवेढा - सोलापूर रोडवर ईचगाव या ठिकाणी शेतकऱ्याने साडे तीन हाजर किलो टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिले. या रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला इतक्या मोठ्या प्रमाणात टोमॅटो कुणी व का टाकले असा प्रश्न पडत होता.
ऑगस्ट महिन्यामध्ये दोनशे रुपये किलो असणारे टोमॅटोचा दर आता कमी झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ईचगाव येथील शेतकरी संदिप पाटील यांनी त्यांच्या शेतामध्ये टोमॅटो लावले होते. यासाठी महिला शेतमजूरांना 300 तर पुरुष शेतमजूराला 400 रुपये प्रमाणे हजेरी दिली. पीक हाताला आल्यानंतर बाजारात भाव आला नाही. त्यामुळे टोमॅटो परत आणत शेताजवळील रस्त्यावर टाकून दिले.
खर्च अडीच लाखांचा नुकसान 50 हजाराचेसंदीप पाटील यांनी दिड एकरामध्ये टोमॅटो लावले होते. यासाठी त्यांना अडीच लाख रुपये खर्च आला. मोडनिंबला येथील बाजारामध्ये गेल्यानंतर टोमॅटो लहान आहेत हे कारण सांगून ते घेतले नाहीत. म्हणून सोलापूर येथे आले तिथेही टोमॅटो घेतले नाहीत. या सर्वांमधून पैसै तर मिळालेच नाहीत उलट 50 हजाराचे रुपयांचे नुकसान झाले.