सोलापूर : दिवाळीत आनंद शिधा वाटपाच्या आमिषाने मागील महिन्यात गहू, तांदूळ व इतर धान्यांचे वाटपच रेशन दुकानदारांनी केले नाही. त्यामुळे आनंदाचा शिधा वाटपाची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी व ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आले आहे.
शासनाच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने रेशन कार्डधारकांना डाळ, साखर, तेल, रवा आदी वस्तू १०० रुपयांत आनंदाचा शिधा या नावाने देण्याची योजना जाहीर करण्यात आली होती; परंतु अन्नधान्य पुरवठा विभागाने या योजनेचा फज्जा उडविला. या योजनेंतर्गत देण्यात येणारे किट कित्येक कार्डधारकांना मिळालेच नाही. या योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच आनंद शिधा वाटपाचे आमिष दाखवून गेल्या महिन्यात देण्यात येणारे धान्यसुद्धा वाटप करण्यात आले नाही, तेव्हा अर्धवट करण्यात आलेले आनंदाचा शिधा व गेल्या महिन्यात वाटप न करण्यात आलेले धान्य या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपब्लिकन अल्पसंख्याक विभाग सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही देण्यात आले आहे.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, जक्काप्पा कांबळे, रावसाहेब परीकक्षाळे, मुकुंद काबंळे, सलीम मुल्ला, रफिक शेख, अरुणा सरवदे, नसरीन शेख, मनीषा काबंळे, इम्रान शेख, समीर मुजावर, इरफान कल्याणी, महेबूब पठाण, प्रतीक फाळके, सोहेल जहागीरदार, नबी तांबोळी, धर्मा माने, अनिल नवगिरे, लारेनस साळवी, दत्ता पवार, चंद्रकांत माने, सुधीर कुमावत, ॠतीक फाळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.