सोलापूर : जीवापाड जपलेल्या पोरानं कोणालाही काही न सांगता घरामध्ये शेतातल्या पिकासाठी फवारणीसाठीचे औषध प्राशन केलं. आईनं चक्क त्याच्या जीव वाचवण्यासाठी थेट ॲम्ब्युलन्सला बोलावून थेट शासकीय रुग्णालय गाठलं. मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास केमवाडी (ता. तुळजापूर) येथे ही घटना घडली.
कीटकनाशक फवारणीचे औषध प्राशन केलेल्या बळीराम संजय माळी (वय-२२, रा. केमवाडी, ता. तुळज़ापूर) याने मंगळवारी सकाळी घरातील सारे आपापल्या कामात व्यस्त असताना कोणालाही काही न सांगता ९ च्या सुमारास कीटकनाशक प्राशन केलं. थोड्यावेळानं त्रास होऊ लागल्याने बळीरामची तडफळ सुरु झाली. उलट्या झाल्या. लागलीच वडील संजय माळी यांनी वडाळा येथील सरकारी दवाखाना गाठला.
येथे प्राथमिक उपचार करण्यात आली. तेथून ॲम्ब्युलन्सद्वारे आई मिनाक्षी माळी व वडील संजय यांनी सोलापूर गाठले. तोपर्यंत सव्वाबारा वाजले होते. तातडीने उपचारास सुरुवात झाली. रुग्णाची तब्येत सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.
पोरगं सुखरुप घरी येऊद्यायाबाबत बळीराम याच्या आई-वडिलांना घरामध्ये कोणाशी भांडण झाले होते का याबद्दल विचारणा केली असता डोळ्यातल्या अश्रूला वाट मोकळी करीत आम्हाला काहीच माहिती नाही, पण पोरगं सुखरुप परत घराकडं आलं पाहिजे, अशी आर्जव केली.