महापालिकेने 25 कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया रद्द करावी; काँग्रेस शहराध्यक्षांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 04:40 PM2023-02-27T16:40:51+5:302023-02-27T16:41:39+5:30

ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

The Municipal Corporation should cancel the tender process for the work worth 25 crores; Congress Mayor's demand | महापालिकेने 25 कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया रद्द करावी; काँग्रेस शहराध्यक्षांची मागणी

महापालिकेने 25 कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया रद्द करावी; काँग्रेस शहराध्यक्षांची मागणी

googlenewsNext

राकेश कदम -

सोलापूर : महापालिका प्रशासनाने बड्या ठेकेदारांना समोर ठेवून जिल्हा नगरोत्थान योजनेतील २५ कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

नरोटे म्हणाले, पालिकेने जिल्हा नियोजन योजनेतून 25 कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया बड्या ठेकेदारांसाठी काढल्याचे दिसून येते. महापालिकेचे कामे करणारे नियमित अनेक ठेकेदार आहेत. त्यांच्यावर यातून अन्याय होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवावी. या संदर्भात नव्याने नियोजन करावे.
यावेळी काँग्रेसचे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राम दुधाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: The Municipal Corporation should cancel the tender process for the work worth 25 crores; Congress Mayor's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.