सोलापूर : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून तरुणींपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बुधवारीही जोडभावी व जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २१ वर्षाची तरुणी मैत्रिणीकडे जाते म्हणून गायब झाली. याशिवाय अन्य दोन ठिकाणी वृद्धांची मिसिंग नोंद झाली आहे. आठवडयात दोन-तीन घटना अशा घडू लागल्या आहेत.
या संबंधी संबंधीत नातलगांनी शोधाशोध करुन ही काही उपयोग न झाल्याने हतबल पालकांनी तक्रार नोंदवली. अन्य दोन तक्रारींमध्ये साठी ते पंच्याहत्तरी ओलांडलेल्यांचा समावेश आहे. कोणालाही न सांगता ते घरातून निघून गेल्याचे म्हटले आहे. बेपत्ता होण्यामध्ये १५ ते २५ वयोगटातील मुली, तरुणी या घरातील कोणालाही न सांगता निघून गेल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यासह अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पथकामार्फत विशेष मोहीम आखण्यात आल्याचे सांगण्यात आले.ताण तणाव अन् संवादाचा अभावतरुण मुली बेपत्ता होण्यामागे आभासी दुनियेचे आकर्षण. सोशल मिडियावरील अंधानुकरण, पालक आणि पाल्यांमधील हरवलेले संवाद ही कारणे असल्याचे कारणे असल्याचे पोलीस यंत्रणा आणि मानसपोचार तज्ञांनी सांगितले.