सोलापूर : वृद्ध कलावंताना शासनाकडून मिळणाऱ्या मानधनात वाढ झाली आहे. त्यामुळे आता मानधन ५ हजार रुपये झाले आहे. मानधन वाढले तरी दोन महिन्यापासून जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना ते मिळाले नाही.
राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेत सुधारणा करून पाच हजार रुपये सरसकट मानधन देण्याचा निर्णय लेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. त्यासाठी १२५ कोटी रुपये इतक्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली होती.
पुर्वी वृद्ध कलावंतांचे अ, ब, क असे वर्गीकरण केले होते. अ वर्गाला ३ हजार १५०, ब वर्गाला २ हजार ७५० तर क वर्गातील कलावंतांना २ हजार २५० इतके मानधन दिले जात होते. कलावंतामधील भेदभाव नष्ट करुन सर्वांना एकाच वर्गात सामावून घ्यावे, तसेच सर्वांचे मानधन समान करुन प्रत्येकाला ५ हजार रुपये द्यावे अशी मागणी केली होती. शासनाकडून ही मागणी मान्य झाली. त्यामुळे वृद्ध कलावंत आनंदी होते. एप्रिल महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होऊन पाच हजार रुपये मानधन मिळेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र दोन महिने झाले वृद्ध कलावंतांना मानधन मिळाले नाही.
माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरुशासनाच्या आदेशाप्रमाणे पाच हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी वृद्ध कलावंतांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. कलावंतांचे आधार कार्ड पडताळणी करण्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मानधन मिळेल असे शासनाकडून सांगण्यात आल्याचे सोलापूर जिल्हा लोक कलावंत संघटनेकडून सांगण्यात आले.