सोलापूर : येत्या काही दिवसांत मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीची तयारी सुरू असून विरोधक हे बैठक अन् बैठकीचा लोगो तयार करण्यातच गुंतले असून आम्ही आता लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागलो आहोत, आशी खोचक टिका उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विरोधकांवर केली.
उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई हे सोमवारी सोलापूर दौर्यावर आले होते. सकाळी त्यांनी नियोजन भवनाच्या सभागृहात पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याची विभागीय बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना देसाई म्हणाले की, आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या ४५ पेक्षा ज्यादा तर विधानसभेच्या २२५ पेक्षा ज्यादा जागा जिंकणार आहोत असेही त्यांनी सांगितले. राज्यात असलेला जलसाठा हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी वापरावा शिवाय ज्या ज्या ठिकाणी आवर्तन सोडावयाची आहेत, ते सोडावेत. दरम्यान, दुष्काळाच्या बाबतीत सरकार संवेदनशील असून जिल्हा नियोजनमधील निधीचा वापर करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना दिल्याचेही देसाई यांनी सांगितले.मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरचराज्याचा मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या विस्तारात अनेकांना संधी मिळू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विस्ताराबाबत निर्णय घेतील. तरीही सुरू असलेल्या चर्चेनुसार येत्या काही दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.