सोलापूर - येथील मेडिकल कॉलेजच्या होस्टेलवरून रिक्षानं सिव्हील हॉस्पिलकडे जात असताना गुरुनानक चौकात रिक्षा डिव्हायडरला धडकून रोडवर पलटी झाली. यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे सहा डाॅक्टर जखमी झाले. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
यातील सहाजण वैद्यकीय शिक्षण घेणारे डॉक्टर आहेत. शासकीय रुग्णालयाकडे येण्यासाठी ते सर्वजण सकाळी ८ च्या सुमारास होस्टेल येथून रिक्षामध्ये बसले होते. ही रिक्षा गुरुनानक चौकातील साधू वासवानी बागेजवळील रोडवर आली असता अचानक रिक्षाचालकाचा ताबा सुटला आणि ती थेट डिव्हायडरला धडकून पलटी झाली. रिक्षामधील सर्वांना किरकोळ जखम झाली. त्यांनी दुसरे वाहन पकडून शासकीय रुग्णालय गाठले. येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सिव्हील पोलिस चौकीत याची नोंद झाली आहे.