सोलापूर : चोरीस गेलेला मालट्रक मंद्रूप पोलिसांनी २४ तासात शोध घेऊन पाठलाग करुन पकडला. या कारवाईत दोघा संशयिताना पकडले असून बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईत समीर अल्लाउद्दीन मुल्ला (रा. तेलगाव भीमा, ता. दक्षिण सोलापूर) व दीपक बिराप्पा कोळी (रा. तेलगाव भीमा) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी वाहन चालक अब्दुलसाब गुड्डूसाब मुल्ला (रा. कनान नगर, विजापूर रोड, सोलापूर) व महबूब शेख (रा. विजापूर) हे दोघे मालट्रक (के.ये.२३/ बी. २१९८) मध्ये रासायनिक खतांची ५८० पोती घेऊन विजापूर- नागपूर जात होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यात तेरामैल येथील एका ढाब्यावर जेवणाकरिता थांबले. हिच संधी साधून संशयितांनी १५ लाखांचा ट्रक व त्यातील ७ लाख ५० हजारांचा खतसाठा आणि १२ हजारांची ताडपत्री असा एकूण २२ लाख ६५ हजार किमतीचा मुद्देमाल पळवला. त्यानंतर चालक अब्दुलसाब मुल्ला यांनी मंद्रूप पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली.
मंद्रूप पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमितकुमार करपे व अंमलदार यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी नांदणी, इंचगाव, तामलवाडी, सावळेश्वर व वरवडे टोल नाका येथे प्रत्यक्ष जाऊन सी.सी. टीव्ही फुटेज तपासले. दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक मोहोळ मार्गे इचगाव टोलनाका येथे जात असल्याचे स्पष्ठ झाले. त्यानंतर पोलिसांनी त्या ट्रकचा पाठलाग सुरू केला आणि मोहोळ-कामती पोलीस ठाणे दरम्यान पकडला. या कारवाईत समीर मुल्ला व दीपक कोळी या दोघांना ताब्यात घेतले