शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मंदिर समितीकडून होणार सोय; कशी असेल व्यवस्था? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:30 IST

वाढती उन्हाची दाहकता लक्षात घेऊन, पत्राशेडमध्ये कुलर व फॅन बसवण्यात येत आहेत.

पंढरपूर : चैत्री यात्रा कालावधीत सुमारे २ ते ३ लाख भविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांना सुविधा देण्याची जबाबदारी १२०० कर्मचारी व स्वयंसेवक पार पाडणार असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. अन्नछत्रामध्ये दुपारी १२ ते २ व रात्री ७ ते ९ या वेळेत अन्नदान सुरू राहणार असून, दर्शन रांगेत दशमी, एकादशी, द्वादशीला लिंबू सरबत, मठ्ठा व तांदळाची अथवा साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.

या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षाने पालन करण्यात येणार असून, त्याबाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नवमीला श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह. भ. प. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे कीर्तन, ह. भ. प. आजरेकर महाराज पंढरपूर यांचा व्दादशीला नैवेद्य, त्रयोदशीला ह. भ. प. गुरू बाबासाहेब आजरेकर महाराज, पंढरपूर यांची कीर्तनाची परंपरा असून, एकादशीला पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा अनुक्रमे सदस्य ह. भ. प. शिवाजीराव मोरे व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होत आहे.

व्हीआयपी दर्शनावर निर्बंधयात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना श्रीचे सुलभ व जलद दर्शनाबरोबरच दर्शन रांग सुलभव जलद गतीने चालवण्यासाठी अनुभवी कमांडोजची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजेची संख्या कमी करून, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध व दर्शनाची वेळ वाढवून सकाळी ६ ते रात्री १२ वाजता करण्यात आली आहे.

दर्शन रांगेत सुविधादर्शनरांग व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्कायवॉक पासून पत्राशेड पर्यंत बॅरिकेटिंग करून त्यावर ताडपत्री टाकणे व कायमस्वरूपी ४ पत्राशेड येथे तात्पुरते ४ असे एकूण ८ पत्राशेड उभारण्यात येत आहेत. या दर्शन रांगेत मॅट, बसण्याची सुविधा, थंड पिण्याचे पाणी, तात्पुरते उड्डाणपूल, शौचालये, विश्रांती कक्ष, बाथरूम, लाईव्ह दर्शन इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वाढती उन्हाची दाहकता लक्षात घेऊन, पत्राशेडमध्ये कुलर व फॅन बसविण्यात येत आहेत. याशिवाय, महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, हिरकणी कक्ष तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसादाची उपलब्धी आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्थाआपत्कालिन व्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक १०० नग सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाइल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बॅग स्कॅनर मशीन, अपघात विमा पॉलिसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरSolapurसोलापूर