सोलापूर : लाॅजचा कुंटणखान्याप्रमाणे वापर करत दोन महिलांना वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवल्याची माहिती मिळताच पोलीसांनी धाड टाकली. बार्शी तालुक्यतील शेलगाव (मा.) येथील लाॅजवर केलेल्या कारवाईत मालकसह मॅनेंजरवर अनैतिक मानव व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी लाॅज व्यवस्थापक श्रीहरी उर्फ शुभम सुखदेव मुठाळ (वय ३०, रा. खामगांव, ता. बार्शी), लाॅज मालक ज्ञानेश्वर रामभाऊ भोसले (रा. वैराग) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल मोरे यांनी बार्शी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिस निरीक्षक साळुंखे यांना अधीक्षक कार्यालयातून मेसेज आला. शेलगाव (मा) हद्दीत चालणा-या हॉटेल विश्वजीत लॉजवरील अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करावी अशी सूचना होती. साळुंखे यांनी त्यांच्या पथकाला सोबत घेऊन शेलगाव (मा.) येथील हाॅटेलवर धाड टाकली. या धाडीत पश्चिम बंगाल आणि परभणी येथील एक अशा दोन महिलांना डांबून ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यांच्या कमाईवर स्वतःची उपजीविका करीत असल्याचे उघड झाले. अधिक तपास पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे करत आहेत.