मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील बहुचर्चित दोन दरोडयाचा उलघडा लावण्यात पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमला यश आले आहे. यामध्ये दरोडेखोरांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद झाली असून या अट्टल दरोडेखोरांना अटक करून ५ लाखाचे १० तोळे सोने जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गंगळवेढा पोलीस ठाणे हद्द्द्दित ७ ऑगस्ट २०२१ व २४ डिसेंबर २०२१ रोजी दोन दरोडे झाले होते. यातील पहिल्या घटनेमध्ये दामाजीनगर मधील सुवर्णा हजारे यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडुन दरोडे खोरांनी प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पतीला लोखंडी गजाने मारहाण करून, हात फॅक्चर करून १.५ तोळे वजनाचे सोने लुटुन नेले होते. तसेच यातील दुस-या घटनेमधील चैतन्य नगर, नागणेवाडी येथील मंदाकिनी सावजी यांच्या बंगल्याच्या दरवाजाची कडी तोडुन आत प्रवेश करून नव वधु दामपत्यांना ठार मारण्याची भिती घालून त्यांच्याकडुन एकुण ११ तोळे ३ ग्रॅम सोने लुटुल नेले होते.
मंगळवेढा शहरातील या पडलेल्या सलग दोन दरोडयामुळे मंगळवेढा शहरात भितीचे व असुरक्षतेची भावणा निर्माण झालेली होती. तसेच दोन्ही दरोडे उघडकीस आणने पोलीसांपुढे आव्हाण निर्माण झाले होते. पोलीसांनी सदर प्रकरणात सखोल तपास करून तांत्रीक पुराव्याचा आधार घेऊन आराेपींना अटक केली. तसेच गुन्हा दाखल झाल्यापासुन फरारी असलेला निष्पन्न आरोपीलाही लोणावळा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लाख रूपये किंमतीचे १० तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. यातील आरोपीतांनी यापूर्वी महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथे अशाप्रकारे गुन्हे केल्याचे माहिती आहे. तसेच यातील आणखीन दोन निष्पन्न आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करून आणखीन गुन्हे उघडकीस येणार आहेत. या प्रकरणी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील दोन सराफाची चौकशी सुरू आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिमत जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील , स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील ,पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापु पिंगळे, अविनाश पाटील, दयानंद हेंबाडे, विठ्ठल विभुते, सचिन बनकर, सुरज देशमुख, सोमनाथ माने, उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दत्तात्रय तोंडले, सुनिल मोरे, सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण कडील अन्वर आत्तार व तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील खाजा मुजावर, नारायन गोलेकर यांनी कारवाई केली आहे.