सदर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सांगोला येथील मार्केट यार्ड व इतर ठिकाणी डाळिंब चोरट्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत.
चिणके येथील माणिक विठ्ठल मिसाळ व संजय विलास जाधव या दोघांची शेतजमीन आहे. दोघांनीही शेतात भगव्या जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. १८ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वाजेपर्यंत दिवसभर बागेवर औषध फवारणी करून रात्री घराकडे परतले. दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दोघेही बागेत फेरफटका मारण्यासाठी गेले असता संजय जाधव यांना त्यांच्या बागेत डाळिंबाचा पाला व काही फळे खाली पडल्याचे दिसून आले. यावेळी दोघांनीही बागेची तपासणी केली असता डाळिंब चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आला.
दोघांनी मिळून चोरीला गेलेल्या डाळिंबाचा सांगोल्यातील मार्केट यार्डात तपास केला. मात्र, डाळिंब मिळून आले नाहीत. याबाबत माणिक विठ्ठल मिसाळ यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध २१ फेब्रुवारी रोजी फिर्याद दाखल केली आहे.